गावाविषयी माहिती
भावेघर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. भावेघर गावात राधाकृष्ण मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ८८८ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे १ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. गावात पुरातन मंदिरे, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून इतर कडधान्य ,फुलशेती ,भाजीपाला पिके घेतली जातात.
भावेघर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ६ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
भौगोलिक स्थान
भावेघर हे गाव वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ १८३.०३४ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण २५६ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ८८८ आहे. त्यामध्ये ४५३ पुरुष व ४३५ महिला यांचा समावेश होतो. उष्ण व दमट हवामान जाणवते.या गावाची मुख्य भाषा मराठी आहे.गावात आदिवासी व कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर राहतात.या गावात मुख्य पिक भात असून इतर कडधान्य , फुलशेती ,भाजीपाला लागवड करतात.
लोकजीवन
भावेघर गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भाजीपाला,फुलशेती कडधान्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
भावेघर च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
संस्कृती व परंपरा
भावेघर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे भावेघर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत देवस्थानमध्ये गावदेवी मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे.
राधा कृष्ण मंदिर – गावाच्या पश्चिम दिशेला असलेले राधाकृष्ण मंदिरामध्ये दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावाच्या दक्षिणेस शिव मंदिर वसलेले आहे.
जवळची गावे
भावेघर गाव वाडा तालुक्यातील पश्चिमेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत. खानिवली ही जवळची बाजारपेठ आहे. तसेच कुडूस व वाडा यासारख्या बाजारपेठा आहेत.